ताबा घेतल्यानंतर तीन महिन्यात पाण्याच्या टाक्या फुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 14:08 IST2018-04-24T14:08:33+5:302018-04-24T14:08:33+5:30

पेठ : येथील शासकिय ग्रामीण रु ग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ठ बांधकामाबाबत सदैव चर्चेत असतांना आता रु ग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ठ नमूना समोर आला आहे.

Water tanks broke for three months after taking possession | ताबा घेतल्यानंतर तीन महिन्यात पाण्याच्या टाक्या फुटल्या

ताबा घेतल्यानंतर तीन महिन्यात पाण्याच्या टाक्या फुटल्या

पेठ : येथील शासकिय ग्रामीण रु ग्णालयाची नवीन बांधकाम केलेली इमारत निकृष्ठ बांधकामाबाबत सदैव चर्चेत असतांना आता रु ग्णांसाठी ठेवलेल्या छतावरील पाण्याच्या टाक्या अल्पावधीत फुटून जमीनदोस्त झाल्याने या इमारत बांधकामाचा अजून एक निकृष्ठ नमूना समोर आला आहे. पेठ हा आदिवासीबहुल तालुका असल्याने येथील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बलसाड रोडवर सुसज्ज अशी सर्व सोयी सुविधायुक्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदरचे बांधकाम करत असतांना त्याच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह ऊभे राहिले. अंदाजपत्रकानुसार काम न करणे, निकृष्ठ दर्जाच्या वाळूचा वापर, अपूर्ण बांधकाम, रॅम्प सुविधा अपूर्ण, पावसाचे पाणी सरळ इमारतीत घुसणे अशा अनेक समस्या असतांना संबंधित विभाग व ठेकेदारांनी सदर इमारत घाईगर्दीत रूग्णालय प्रशासनाकडे वर्ग केली. मात्र तीन महिन्याच्या कालावधीतच या इमारतीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या फुटून त्यांचे तुकडे झाले. यामुळे रु ग्णांचा ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी जीव कासावीस होतांना दिसून येतो. ग्रामीण रु ग्णालयाच्या दोन इमारतीच्या मध्यभागी मोकळी जागा सोडली असून याच ठिकाणी विविध तपासणी खोल्या असून रु ग्णांना या मोकळ्या जागेचा आसरा घ्यावा लागतो. मात्र दोन इमारतींना जोडणार्या या जागेवर पारदर्शक पत्र्यांचा डोम टाकणे आवश्यक असतांना तो टाकला नसल्याने ऊन्हाळ्यात रूग्णांना उन्हाचा तर पावसाळ्यात पावसाचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Water tanks broke for three months after taking possession

टॅग्स :Nashikनाशिक