वाजगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 15:15 IST2019-02-28T15:15:17+5:302019-02-28T15:15:26+5:30
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर उपसरपंच दिपक देवरे यांनी शासकीय टँकरची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाजगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर उपसरपंच दिपक देवरे यांनी शासकीय टँकरची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असून वाजगाव ग्रामपंचायतीने शासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती ग्रामसेवक जे.व्ही. देवरे यांनी दिली आहे. वाजगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, व विधन विहीर कोरडी पडल्यामुळे आठवडाभरापासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यामुळे त्रस्त झालेल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता. गावात त्वरीत टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. उपसरपंच दिपक देवरे यांनी गुरु वारी सकाळी स्वखर्चाने गावात टँकर सुरू करून गावातील जनतेला दिलासा दिला.