पाणी पुरवठा योजना गांभिर्याने राबवा : सांगळे

By Admin | Updated: June 12, 2017 00:36 IST2017-06-12T00:36:10+5:302017-06-12T00:36:30+5:30

पाणी पुरवठा योजना गांभिर्याने राबवा : सांगळे

Water supply scheme must be taken seriously: Sangale | पाणी पुरवठा योजना गांभिर्याने राबवा : सांगळे

पाणी पुरवठा योजना गांभिर्याने राबवा : सांगळे

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येवला तालुक्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. टंचाईग्रस्त गावांना शासनाचे पाणी टँकर विहित वेळेत मिळावे यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावा अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी येवला तालुका आढावा बैठकीत केली.
येवला पंचायत समीती कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, येवला पंचायत समीती सभापती आशाताई साळवे, पंचायत समीती सदस्य मोहन शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते संभाजीराजे पवार, जिल्हा परिषद सदस्य सविता पवार, उदय सांगळे, मकरंद सोनवणे उपस्थित होते. सांगळे यांनी विविध विभागांच्या विकास कामांच्या आढावा घेत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वृक्षलागवड कार्यक्र म राबविण्याबाबत सूचना केल्या. त्याचप्रमाणे जिल्हा येत्या डिसेंबर २०१७ अखेर हगणदारीमुक्त करावयाचा आहे. यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांसोबत प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विस्तार आधिकारी यानी जनजागृती करावी. तसेच खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना खते व बी बियाणे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Water supply scheme must be taken seriously: Sangale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.