पेठ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचरगाव येथे महिंद्रा ई.पी.सी. कंपनीच्या सामाजिक दायित्वातून स्वच्छतागृह, बोअरवेल आणि रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला.वसंत थेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिंद्रा ई.पी.सी. कंपनीच्या सीएसआर निधीतून मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, बोअरवेल, पंप तसेच संपूर्ण इमारतीला रंगकाम केलेल्या कामाचा कोरोना विषयक नियम पाळून शुभारंभ करण्यात आला. ऐन ऊन्हाळ्यात शाळेच्या मुलांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी माजी उपसभापती वसंत थेटे, महिंद्रा कंपनीचे प्रशासन प्रमुख मकरंद मल्लीकर, प्रशासक रमेश घुले, सरपंच मंदा लिलके, उपसरपंच रघुनाथ आहेर, मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहू टोंगारे, केंद्रप्रमुख मीरा खोसे, ग्रामसेवक गायकवाड, हरिदास लिलके, मोतीराम बेडकूळे, राजेंद्र टोंगारे, कमल लिलके, दामू टोंगारे, बाळू लिलके, मुख्याध्यापक मनोहर पवार आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. नरेंद्र कोर यांनी सूत्रसंचालन तर वंदना देवरे यांनी आभार मानले.
कोचरगाव शाळेला सहभागातून बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:21 IST
पेठ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोचरगाव येथे महिंद्रा ई.पी.सी. कंपनीच्या सामाजिक दायित्वातून स्वच्छतागृह, बोअरवेल आणि रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला.
कोचरगाव शाळेला सहभागातून बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा
ठळक मुद्देऊन्हाळ्यात शाळेच्या मुलांना पाण्याची सुविधा उपलब्ध