नाशिकरोड भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 01:38 AM2022-01-26T01:38:41+5:302022-01-26T01:39:05+5:30

नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, तिच्या दुरुस्तीमुळे या भागात गुरुवारी (दि.२७) दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.२८) दुपारनंतरचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

Water supply cut off in Nashik Road area on Thursday | नाशिकरोड भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

नाशिकरोड भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Next

नाशिक : नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीला उपनगर नाका ते आम्रपाली झोपडपट्टी कालवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गळती होत असून, तिच्या दुरुस्तीमुळे या भागात गुरुवारी (दि.२७) दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.२८) दुपारनंतरचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

महापालिकेने कळविल्यानुसार नाशिकरोड भागातील प्रभाग क्रमाक १७ मधील कालवा रस्ता परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळीरोड, भीमनगर, याच भागातील प्रभाग क्रमांक १८ मधील शिवाजी नगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गाव, सायखेडा रस्ता, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग १९ मधील गोरेवाडी, चेहडी, नाशिक-पुणे महामार्ग परिसर, एकलहरा रस्ता, सामनगाव, चाडेगाव पंपिंग परिसर, प्रभाग २० मधील पुणे रस्ता, रामनगर, विजयनगर, शाहुनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातानगर, तसेच प्रभाग २१ मधील जयभवानी रस्ता, सहाणे मळा, लवटेनगर एक व दोन, तोफखाना केंद्र रस्ता, दत्तमंदिर रस्ता, धोंगडेनगर, जगताप मळा, तरण तलाव परिसर, चव्हाण मळा, फर्नांडिसवाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर, गोसावी वाडी, राजेंद्र कॉलनी, आनंदनगर, आडकेनगर आणि प्रभाग क्रमांक २२ मधील रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदरनगर, डावखरवाडी, जयभवानी रस्ता, अश्विनी कॉलनी, जेतवननगर, बिटको महाविद्यालय तरण तलाव, सौभाग्यनगर, बागुलनगर, देवळाली गांव, मालधक्का रोड, गाडेकर मळा, एम. जी. रोड, गिते मळा, खर्जुल मळा, विहित गाव या भागात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे.

Web Title: Water supply cut off in Nashik Road area on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.