चांदगावकरांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST2018-02-16T00:00:51+5:302018-02-16T00:03:28+5:30
येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

गावातील नागरिक व महिलांची पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती होत आहे, या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अझहर शाह यांनी चांदगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावेळी बबनराव साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते पाणीवाटप करण्यात आले. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला; मात्र येवला तालुका कोरडाच राहिल्याने आता उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसून येत आहे.
या प्रश्नाची जाण राखून सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे. या सामाजिक कार्याबद्दल चांदगाव ग्रामस्थांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे.महिनाभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव पडूनयेवला तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनीदेखील परिसराची पाहणी केली; मात्र यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होतो.
महिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.