शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पाण्याचे स्रोत कायमस्वरूपी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:26 AM

नाशिक जिल्ह्यात पाण्याचे सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी करण्यात येऊन त्यात निम्म्याहून अधिक स्रोत जमिनीखालील पाणी आटल्यामुळे कायमस्वरूपी बंद झाल्याचे आढळून आले असून, ज्या स्रोतांमध्ये पाणी आढळले त्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. या पाण्याच्या स्रोतांचे शंभर टक्के जिओ टॅगिंग करण्यात आल्यामुळे भविष्यातही त्यातील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजिओ टॅगिंग । पाण्याचे नमुने तपासणीसाठी रवाना

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाण्याचे सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी करण्यात येऊन त्यात निम्म्याहून अधिक स्रोत जमिनीखालील पाणी आटल्यामुळे कायमस्वरूपी बंद झाल्याचे आढळून आले असून, ज्या स्रोतांमध्ये पाणी आढळले त्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. या पाण्याच्या स्रोतांचे शंभर टक्के जिओ टॅगिंग करण्यात आल्यामुळे भविष्यातही त्यातील पाण्याच्या स्रोताबाबत माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यात पाणी स्रोतांची तपासणीचे अभियान १ मार्च ते १५ जून या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने शासनाने तयार केलेल्या जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात आले असून, जिल्ह्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यात जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपचा वापर करून एकूण ७३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत प्रथमच स्रोतांचे १०० टक्के टॅगिंग करण्यात आल्याने टॅगिंग केलेल्या स्रोतापैकी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ४,५६९ स्रोतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत देण्यात आले आहेत. उर्वरित २८२४ स्रोतांपैकी काही स्रोत विविध कारणांमुळे बंद, कायमस्वरूपी बंद, वापरात नसलेले, पाण्याअभावी कोरडे आढळून आले आहेत. सर्वेक्षणातून मिळालेल्या सर्व पाणी नमुन्यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सहा उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. राज्यात नाशिक, पालघर, नंदुरबार व धुळे याच जिल्ह्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात या अभियानात तालुकास्तर ते ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून आरोग्य, ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी अत्यंत चागल्या प्रकारे समन्वय साधून विहित वेळेत काम पूर्ण केले असून, राज्यात जिल्हा या कामात अव्वल असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.असे होते जिओ फेन्सिंगसार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने सॅटेलाइटद्वारे टॅग करण्यासाठी शासनाने नागपूर येथील एम. आर. सॅक या संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओ फेन्सिंग हे एक मोबाइल अ‍ॅप असून, सदर अ‍ॅप पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात. स्रोताच्या १० मीटरच्या परिघात गेल्यावर, अ‍ॅप सुरू करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन, फोटो घेऊन नमुना घेण्यात येतो. याद्वारे जिल्ह्यात किती स्रोतांची तपासणी झाली किती स्रोत शिल्लक राहिले याची माहिती मिळते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी