शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:52 IST

कळवण : शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे; परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत त्यासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे शिवाय शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी बांधवांची भटकंती : शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

कळवण : शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे; परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत त्यासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे शिवाय शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी गेली तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या योजनेला असलेला विरोध लक्षात घेऊन तालुक्यातील जनतेला प्रथम पाणी आरक्षण करणे गरजेचे आहे.तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन-चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे; मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे; मात्र पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगर कपारीतील आदिवासी वस्ती-पाडे या गाव-वस्तींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसर्गिक नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरविण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरडेठाक पडलेले आहेत, अशी वस्तुस्थिती कळवण तालुक्यात आहे.(पान ६ वर)धरण उशाशी अन् कोरड घशाशी उन्हाळ्यात आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे? कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताणे, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याणे, गणोरे, सुळे, लखाणी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे.उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्षउन्हाळ्यात पाणी मागणी करणार नाही असे ठराव ग्रामपंचायतीकडून करून घेतल्याने मार्च महिन्यातच या गावांना पाणीटंचाई जाणवू लागते, तेव्हा पाण्याची भटकंती सुरू होते. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मग आदिवासी बांधवांनी उन्हाळ्यात पाण्यासाठी जायचे तरी कुठे? असा सवाल आदिवासी बांधव करतात. पुनंद प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्या अंतर्गत कालवे बांधले, ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत आहे.