देवळा तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:03 IST2019-05-16T13:01:05+5:302019-05-16T13:03:23+5:30
उमराणे : देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याची तिव्र टंचाई जाणवु लागल्याने प्रशासनाकडुन नऊ गावात ११ टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

देवळा तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई
उमराणे : देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांशी गावांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याची तिव्र टंचाई जाणवु लागल्याने प्रशासनाकडुन नऊ गावात ११ टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. चालुवर्षी तालुक्याच्या पुर्व भागात सरासरीपेक्षाही अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय गेल्या एक ते दिड महिन्यांपासून उन्हाची तिव्रता वाढल्याने या भागातील पाण्याचे श्रोत असलेले जलसाठे, विहीरी, बोअरवेल्स, कुपनलीका आटल्याने या भागातील जनतेला तिव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. याबाबत या भागातील जनतेकडुन ट्रॅकरची मागणी वाढल्याने प्रशासनाने सदर गावांच्या पाणीटंचाईचा आढावा घेऊन उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, वर्हाळे, म.फुलेनगर, दिहवड, डोंगरगाव आदी नऊ गावांना ११ टॅकरने २२ फेऱ्यांद्वारे रामेश्वर धरणातून तसेच महालपाटणे येथील अधिग्रहण केलेल्या विहीरीतुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे या गावातील नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. परंतु काही वाड्यावस्त्यांवर अद्यापही पाणी पोहचले नसल्याने तेथील नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा आहे.