कोकणगाव बंधाºयाच्या दुरवस्थेने पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:20 IST2019-06-27T00:20:17+5:302019-06-27T00:20:39+5:30
कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत आहे.

कोकणगाव बंधाºयाच्या दुरवस्थेने पाणीटंचाई
कादवा नदीवरील असलेल्या बंधाऱ्याची झालेली पडझड.
कोकणगाव : शेती आणि पिण्यासाठी म्हणून सुमारे तीस वर्षांपूर्वी कादवा नदीवर बांधण्यात आलेल्या कोकणगावच्या बंधाºयाची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या बंधाºयात पाणी साठत नसल्याने या बंधाºयावर अवलबूंन असलेली शेती संकटात सापडली आहे. बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत आहे.
कादवा नदीवरील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे तक्र ार करूनदेखील ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी नादुरुस्त असलेला बंधारा फेब्रुवारी महिन्यातच कोरडाठाक पडला होता. त्यामुळे येथील शेतकºयांना द्राक्षे तसेच रब्बी हंगामातील पिकांवर पाणी सोडावे लागले. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना पुरेसे पाणी मिळत नाही.
तीन-चार वर्षांपासून त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. सदर बंधाºयाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी लाभधारक शेतकरी तसेच रामकृष्ण गायकवाड, अण्णासाहेब मोरे, राजेंद्र गायकवाड, विलास गायकवाड, शरद गायकवाड, गोविंद मोरे, विश्वास मोरे, गणपत मोरे, शरद मोरे, विनायक मोरे, दिलीप मोरे, अतुल मोरे आदींनी केली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या या बंधाºयाविषयी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विषय मांडत आहे; परंतु ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीनता दाखवित असल्याने येथील शेतकºयांना शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासकीय स्तरावर तातडीने या बंधाºयाची दखल घेतली जाऊन दुरुस्ती व्हावी.
- अर्जुन गायकवाड, रहिवासी, कोकणगाव