नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी परिसरात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे सावट वाढू लागले आहे. त्यामुळे वाडया वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे.यावर्षी पावसाचे अल्प प्रमाण असल्याने विहिरी कोरडया ठाक पडल्या आहे. परिसरातील कणकोरी, निºहाळे, मºहळ, सुरेगाव, खंबाळे आदी भागात पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिसरात चारा छावण्या व टॅँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढू लामली आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने खरिप हंगामाबरोबर रब्बी हंगाम वाया गेल्याने दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट होते. त्यामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे.
मानोरी परिसरात पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 17:48 IST