शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:43 IST

खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही.

ठळक मुद्दे खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले.प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही.पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

मालेगाव - खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. यामुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील पांगरीकुटे या गावापासून जवळच खेडी नावाचे गाव वसलेले आहे. गावात पाणीपुरवठ्याचा कुठलाही प्रभावी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातच गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तशीच गंभीर परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने टँकरव्दारे गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे; परंतु टँकर अद्याप सुरू झालेले नाही.

ऋषी महाराज संस्थानवरील भोजनावळींवरही परिणाम

खेर्डी येथे ऋषी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. याठिकाणी मालेगाव तालुकाच नव्हे; तर नजिकच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यानिमित्त सोमवारी, गुरूवारी प्रसाद म्हणून भोजन दिले जाते. यंदा मात्र भीषण पाणीटंचाईमुळे या धार्मिक कार्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामपंचायतीचे प्रयत्न ठरले निष्फळ

रेगाव-खेर्डी गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विलास नवघरे, सरपंच वेणूबाई रमेश खंडारे, उपसरपंच ज्ञानेश्वर बापूराव आंधळे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी खेर्डी गावाला तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा ठराव घेवून तो मालेगाव पंचायत समितीला सादर केला; मात्र ग्रामपंचायतीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले असून टँकर अद्याप सुरू झालेले नाही. 

गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

खेर्डी गावाला विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करा; अन्यथा मालेगाव पंचायत समिती व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सरपंच वेणूबाई खंडारे, उपसरपंच आंधळे, कल्पना गायकवाड, सत्यभामा काळे, सिंधू सातपुते, रेखा घुगे, कान्होपात्रा आंधळे, सुनिता शेंडगे, कल्पना शेंडगे, काळुबाई कालापाड, लक्ष्मीबाई इंगोले, प्रतिभा गायकवाड, नेहा आंधळे, अरूणा थिटे, लक्ष्मी काळे, सुभद्रा आंधळे, कौशल्या भेंडेकर आदिंनी दिला आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकMalegaonमालेगांव