विंचूरला पाइपलाइन फुटल्याने पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:29+5:302021-02-05T05:37:29+5:30
पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन लिकेज असल्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी गटारात जात होते. त्यामुळे विंचूर शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले, माजी जिल्हा परिषद ...

विंचूरला पाइपलाइन फुटल्याने पाणी रस्त्यावर
पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन लिकेज असल्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी गटारात जात होते. त्यामुळे विंचूर शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ विंचूर येथे धाव घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. विंचूर ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी खैरनार यांना तिनपाटी येथे बोलावून सदर प्रकार निदर्शनास आणून दिला. तसेच निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना माहिती दिली असता त्यांनी त्वरित सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे सचिव शरद पाटील यांना तात्काळ लिकेज थांबविण्याचे आदेश देऊन नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्याच्या सूचना दिल्या.
इन्फो
अन् आंघोळ आंदोलन स्थगित!
शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील पाइपलाइन लिकेजच्या ठिकाणी आंघोळ करून अनोखे आंदोलन करणार होते, मात्र अधिकाऱ्यांनी लिकेज काढून नागरिकांची भटकंती थांबविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीरज भट्टड, सचिन दरेकर, दिलीप चव्हाण, राजू मोरे यांसह नागरिकांनी सोळगाव पाणीपुरवठा योजनेच्या समितीने याबाबत तत्काळ निर्णय घेऊन ठिकठिकाणी असलेले लिकेज काढून लाखो लीटर वाया जात असलेले पाणी थांबविण्याची मागणी केली.
फाेटो- ०२ विंचूर पाइपलाइन
===Photopath===
020221\02nsk_33_02022021_13.jpg
===Caption===
फाेटो- ०२ विंचूर पाईपलाइन