नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकºयांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन हादरले असून, येत्या सोमवारी आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे.पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकºयांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्यांतील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकºयांची अपरिमित हानी होत असून, उभी पिके जळू लागली आहे. त्याचबरोबर येवला, निफाड तालुक्यांसह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून आवर्तन द्यावे, अशी भुजबळांची मागणी होती. मात्र अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होऊन शेतकºयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. भुजबळ यांनी इशारा देताच यंत्रणा हलली असून, सोमवार, दि. १९ पासून पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. पत्रकात म्हंटले आहे की पालखेड धरण समूहातील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन सोमवारपासून सोडण्यात येत आहे याची लाभक्षेत्रातील शेतकरी बिगर सिंचन संस्था यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणे, डोंगळ्याद्वारे पाणी उपसा करणे तसेच कर्मचारी-अधिकारी यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कृत्य केल्यास पाटबंधारे अधिनियमानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही विभागाच्या पत्रकात देण्यात आला आहे.
भुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:15 IST
पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकºयांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन हादरले असून, येत्या सोमवारी आवर्तन सोडण्याची तयारी दर्शविली आहे.
भुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले
ठळक मुद्देआंदोलनाचा धसका : पालखेडमधून सोमवारी आवर्तन