अपर पुनंद प्रकल्पासाठी पाणी आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:43 IST2019-02-05T00:36:41+5:302019-02-05T00:43:44+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित अपर पुनंद प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने ८२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. या निर्णयामुळे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या दक्षिण आरम खोऱ्यातील २१ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

अपर पुनंद प्रकल्पासाठी पाणी आरक्षित
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित अपर पुनंद प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने ८२ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. या निर्णयामुळे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या दक्षिण आरम खोऱ्यातील २१ गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बागलाण तालुक्यातील सटाणा शहरासह आरम खोºयाच्या डाव्या बाजूकडील सर्व गावे तसेच सुरुबारी, पिंपळेमाळ, केळझर, भावनगर, करंजखेड, साकोरे, वाड्याचे पाडे, बुंधाटे, डांगसौंदाणे, चाफ्याचा पाडा, दहिंदुले, कंधाणे, तिळवण, नवेगाव, जुने निरपूर, नवे निरपूर, खमताणे, मुंजवाड, दºहाणे,पिंपळदर, मळगाव, मोरेनगर या गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न भेडसावत होता. अपर पुनंद प्रकल्पामुळे या सर्व गावांचा प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. यासाठी हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे होते. गेल्या तीस वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होत आहे. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे उपरोक्त सर्व गावांच्या शेतकºयांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
गेल्या वर्षभरात या प्रकल्पाचा पूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी देखील याबाबत चर्चा होऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. सर्वेक्षणाच्या सूचना जलसंपदा कार्यकारी अभियंता मुसळे, शिंदे, उपमुख्य अभियंता आमले, अव्वल सचिव माहरनर यांनी प्रकल्पासाठी प्रथमत: ८२ दलघफू पाणी आरक्षित करण्याचे ठरविले आणि सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉ. भामरे यांनी सांगितले.