नाशिक : तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच्या नगरसेवकांशीदेखील कलगीतुरा रंगला.महापालिकेची मासिक महासभा शुक्रवारी (दि.२०) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र ‘सेंट्रल किचन’च्या ठेक्यावरून साडेपाच तास चर्चा झाल्याने हा विषय बाजूला ठेवण्याची विरोधकांची मागणी होती. ११ पानी इंग्रजी भाषेतील करार वाचून त्यावर अभ्यास करण्याची कोणाचीही तयारी नव्हती. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी कराराच्या प्रती सर्व नगरसेवकांना मराठीत सादर कराव्या आणि नंतर विशेष सभेत त्यावर चर्चा करण्यात येईल, असे जाहीर केले.दरम्यान, पहिल्याच सभेत महापौरांचा स्वपक्षियांशी कलगीतुरा रंगला. दिनकर पाटील यांनी ‘सेंट्रल किचन’च्या मुद्द्यावरून बोलताना आयुक्त मुद्दामहून सभागृहातून बाहेर गेले, ते माझे फोन घेत नाही. हे कोणत्या कायद्यात बसते? असा प्रश्न केला.महापौर म्हणाले, आमच ठरलंय..‘सेंट्रल किचन’च्या विषयावर लक्ष्यवेधीवर चर्चा करण्यासाठी फक्त गटनेत्यांनी बोलवावे, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी (दि.१९) सांगितले होते. शुक्रवारी (दि.२०) महासभेत विरोधी पक्षनेत्यांचे भाषण झाल्यानंतर सुधाकर बडगुजर, लवटे यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी हात वर केले. मात्र महापौरांनी फक्त गटनेतेच बोलतील आमचे तसे ठरलेय, असे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षातील सर्वच नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी असे कोणी ठरवले, आमचा हक्क का हिरवतात? असा प्रश्न केला. गटनेत्यांच्या बैठकीत काय ठरले ते सांगा, असा गोंधळ घातला. त्यानंतर राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार आणि महापौर कुलकर्णी यांनीही आपल्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याने मोजक्याच गटनेत्यांनी बोलावे, असे आवाहन केले होते. परंतु आता बोलायचे असेल तर कमीत कमी वेळ बोला, असे सांगितल्यानंतर नगरसेवक शांत झाले आणि या विषयावर साडेपाच तास चर्चा झाली.
पाणी आरक्षण कराराचा प्रस्ताव तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:56 IST
तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच्या नगरसेवकांशीदेखील कलगीतुरा रंगला.
पाणी आरक्षण कराराचा प्रस्ताव तहकूब
ठळक मुद्देमहासभा : पहिल्या वेळीच कामकाजात महापौरांचा कलगीतुरा