दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी दरसवाडी धरणातून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:50 IST2019-09-19T20:49:43+5:302019-09-19T20:50:09+5:30
येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.

दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी पाणी सोडताना जमलेले लोकप्रतिनिधी व ग्रामस्त.
येवला : दरसवाडी धरणातून पाणी दुष्काळग्रस्त येवला तालुक्यासाठी गुरुवारी (दि.१९) पाणी सोडण्यात आले.
२५ जुलैला मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पाण्याचे जलपूजन झाले. पुणेगाव, ओझरखेड या धरणांमध्ये शून्य टक्के पाणी होते. देवसाने भागात पाऊस सुरू झाला आणि मांजरपाडाचे पाणी उनंदा नदीत वाहायला लागले. त्यानंतर १० दिवसात तर पुणेगाव आणि ओझरखेड दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली. त्यानंतर जलसंपदा विभागाने लीकेज, चढ-उतार यावर मार्ग काढला, व केद्राईचे पाणी दरसवाडी धरणासाठी सोडण्यात आले. येवल्यात पाणी नेण्याकरता पूर्व तयारीसाठी दरसवाडी ते बाळापूर हा कालवा साफसफाईचे काम पुर्ण करून घेतली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माधव पवार, अरु ण थोरात, दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरु ण शिरसाट, गणपत कांदळकर, अशोक मेंगाने, बबन शिंदे, सचिन कळमकर, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, विजय खैरनार, अशोक कुळधर, प्रकाश बागल, विजय खैरनार यांच्यासह येवला तालुक्यातील व दरसवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
आमची तीसरी पीढी या पाण्याची वाट पाहत होती. मांजरपाड्याचे शास्वत पाणी असल्याने आता बाळापुर पर्यंत पाणी येईल. पाणी येणे म्हणजे आमच्यासाठी नव्या विश्वाची सुरु वात आहे.
- मोहन शेलार, सदस्य, पंचायत समिती, येवला.