मुखेडला पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:27 IST2018-07-20T00:26:26+5:302018-07-20T00:27:06+5:30
येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बैरागी आदी उपस्थित होते.

मुखेडला पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा
येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बैरागी आदी उपस्थित होते.
पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होऊ नये व साथीचे रोग पसरू नये या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या सूचनेनुसार गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत पाणी शुद्धतेबाबत वक्तयांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेस आरोग्यसेवक डॉ. पैठणकर, डॉ. मढवई यांनी पाणी गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी चिचोंडीचे सरपंच रवींद्र गुंजाळ, सत्यगावचे सरपंच भवर, ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस देवचंद शिंदे, जळगाव नेऊरचे ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, निमगावचे ग्रामसेवक आर.सी. महाले, सत्यगावचे ग्रामसेवक थोरात, चिचोंडी बु ग्रामसेवक पडवळ, चिचोंडी खु।।चे ग्रामसेवक चंद्रकांत बोरसे, पुरणगावचे ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी मुखेड गटातील साताळी, महालखेडा, चिचोंडी, एरंडगाव, जळगाव नेऊर, मुखेड, पारेगाव, देशमाने, मानोरी, निमगाव आदी गावातील जलसुरक्षक उपस्थित होते.