आदिवासी भागातील जनतेची पाणी समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:39 IST2021-06-22T17:38:25+5:302021-06-22T17:39:56+5:30
पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, धरतीआबा बिरसा मुंडापार्क, जलपरिषद मिशन ११११ वृक्षारोपण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

नरहरी झिरवाळ यांच्या भेटी प्रसंगी राकेश दळवी, जनार्दन खोटरे, नितेश्वर खोटरे, संजय गवळी, दुर्गादास गायकवाड आदी.
पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, धरतीआबा बिरसा मुंडापार्क, जलपरिषद मिशन ११११ वृक्षारोपण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
जलपरिषदेच्या वृक्षारोपण मोहिमेचे यावेळी त्यांनी कौतुक केल्याची माहीती जलपरिषदेने मंगळवारी दिली. यावेळी वित्त व लेखाधिकारी जनार्दन खोटरे, गांगोडे भाऊसाहेब, गुंजाळ, संजय गवळी, दुर्वादास गायकवाड, राकेश दळवी व गितेश्वर खोटरे आदी उपस्थित होते.
यावेळी आदिवासींचा कल्पवृक्ष मोह त्यांना भेट स्वरूपात देण्यात आला.