""वॉटर इनोव्हेशन चॅलेंज"" स्पर्धेत के. के वाघ महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:55+5:302021-06-09T04:17:55+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपभोगत्याला पाणी नियोजन करून देते, म्हणून ''''मोस्ट प्रॉमिसिंग सोल्यूशन''''च्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गटातून पारितोषिक ...

""वॉटर इनोव्हेशन चॅलेंज"" स्पर्धेत के. के वाघ महाविद्यालयाचे यश
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपभोगत्याला पाणी नियोजन करून देते, म्हणून ''''मोस्ट प्रॉमिसिंग सोल्यूशन''''च्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गटातून पारितोषिक मिळाले, तसेच जागतिक पाणी परिषद २०२२ करिता स्कॉलरशीप मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी दिली. एकत्त्वम इनोव्हेशन्स प्रा. लिमिटेडची स्थापना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाउंडेशनच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर या नाशिकस्थित सोशल इनोव्हेशन सेंटर येथे झाली. पाण्याशी संबंधित आव्हाने सोडवण्यासाठी तसेच पाणी स्रोत, नियोजन आणि साठा या प्रश्नासाठी ही स्पर्धा घेण्याचा उद्देश होय. जगभरातून ४०० संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात ११ स्टार्टअप संघ निवडले गेले. त्यात ४ भारतीय, ३ डेन्मार्कचे २ केनियाचे आणि २ घानाचे, या देशांनी प्रतिनिधित्व केले.
भारत आणि डेन्मार्क यांनी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशीपअंतर्गत पाणी या विषयावर सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरचे मेंटॉर संदीप शिंदे आणि नंदना चक्रबोर्ती यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले, अशी माहिती उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा. चारुदत्त म्हसदे यांनी दिली.
याप्रसंगी के. के. वाघ अभियांत्रिकीचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे, संगणक विभागप्रमुख डॉ. शिरीष साने, उत्पादन विभागप्रमुख डॉ. पद्माकर पवार, स्थापत्य विभागप्रमुख डॉ. प्रदीप जाधव आणि डॉ. दिनेश चांदवडकर उपस्थित होते.
(फोटो ०७ के.के. वाघ कॉलेज)