शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:32 IST

कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली.

नायगाव : कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत नायगावचे सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांनी स्वत:च्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तीव्र टंचाईच्या काळातसरपंच कातकाडे यांनी केलेलेकाम परिसरात कौतुकाचा विषय ठरले.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नायगाव खोऱ्यात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात होणाºया पाणीपुरवठ्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी ठरू लागली होती. अशी टंचाईची परिस्थती असताना गावाला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे बनले होते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे ठरले; मात्र एवढ्या मोठ्या गावाला टँकरने किती व कसा पाणीपुरवठा होणार याचीही चिंता सर्वांना होती. अशा परिस्थितीत सरपंच नीलेश कातकाडे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देण्याची कल्पना घरातील सदस्यांसमोर मांडली. त्यास सर्वांनी पुण्याचे काम होत असल्याने सहमती दर्शविली.गेल्या पंधरा दिवसांपासून कातकाडे यांच्या विहिरीवरून ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धिकरणामार्फत नळयोजनेला पाणी सोडले जात आहे. कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सरपंच कातकाडे यांच्या सहकार्याने सध्या दिवसाआड सुरू झाला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावाप्रती दाखविलेला जिव्हाळा सर्वांनाच आपुलकीचा गारवा निर्माण करणारा ठरला आहे.टंचाईच्या काळात पिकाऐवजी गावाला पाणी दिल्यामुळे शेतातील पिकांना विशेषत: एक एकर कोथिंबीर पिकास मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNashikनाशिक