पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलरत्नांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:32 IST2018-08-07T20:31:23+5:302018-08-07T20:32:03+5:30
चांदवड - चांदवड तालुक्यातील अनेक गावांंना पाणीदार करण्यासाठी अनेक लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.यात ज्या १९ गावांनी उत्कृष्ट काम केले त्या जलरत्नांचा सन्मान तहसिल कार्यालयाच्या आवारात सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदवड पाणी फॉउंडेशन टीमने आयोजित केला होता.अध्यक्षस्थानीआमदार डॉ.राहुल अहेर हे होते.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलरत्नांचा सत्कार
चांदवड - चांदवड तालुक्यातील अनेक गावांंना पाणीदार करण्यासाठी अनेक लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.यात ज्या १९ गावांनी उत्कृष्ट काम केले त्या जलरत्नांचा सन्मान तहसिल कार्यालयाच्या आवारात सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदवड पाणी फॉउंडेशन टीमने आयोजित केला होता.अध्यक्षस्थानीआमदार डॉ.राहुल अहेर हे होते.
आहेर यांच्या हस्ते प्रांताधिकारी,तहसीलदार,कृषिअधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी,सरपंच, ग्रामपंचायत , तलाठी, ग्रामसेवक, योगदान दिलेली व्यक्ती, ग्रामस्थ तसेच सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्गाचे यावेळी सन्मान पत्र व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनेक सरपंच ग्रामस्थांनी आपले अनुभन सर्वांसमोर मांडले यावेळी कार्यक्र मास तहसीलदार डॉ.शरद मंडलिक, पंचायत समिती सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, पंचायत समिती सदस्य ज्योती अहेर,भाजपा तालुका अध्यक्ष सुनील शेलार, अशोक भोसले, प्रशांत ठाकरे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, १९ गावांचे सरपंच ,तलाठी,ग्रामसेवक,ग्रामस्थ , जलमित्र व कार्यक्र म आयोजित करणारे पाणी फॉउंडेशनचे सर्व तालुका समन्वयक यावेळी उपस्थित होते.
-