पळसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी; सिन्नरचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:30 IST2019-08-06T23:27:57+5:302019-08-06T23:30:07+5:30
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातलगत असलेल्या पळसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिसरल्याने सिन्नरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पावसाची कृपादृष्टी झाली असतानाच दारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी सिन्नरला पाणीपुरवठा करणाºया पंपिंग स्टेशनमध्ये घुसल्याने पंपिंग बंद पडले आहे.

पळसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी; सिन्नरचा पाणीपुरवठा बंद
ठळक मुद्देयंत्रसामग्रीत काही बिघाड झाला
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातलगत असलेल्या पळसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिसरल्याने सिन्नरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पावसाची कृपादृष्टी झाली असतानाच दारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी सिन्नरला पाणीपुरवठा करणाºया पंपिंग स्टेशनमध्ये घुसल्याने पंपिंग बंद पडले आहे. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत व यंत्रसामग्रीत काही बिघाड झाला असेल तर तो दुरुस्त होईपर्यंत सिन्नर शहरातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, हेमंत वाजे यांनी दिली व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.