शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

महागड्या कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 3:01 AM

लासलगावातही भावात घट; किरकोळ बाजारात तेजी, डिसेंबरपर्यंत भाव चढेच

नाशिक : कांद्याच्या भावाने नुकतीच ५० रुपयांची पातळी ओलांडल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे भाव २३० रुपयांनी घसरल्याने केंद्र सरकार सध्या साठवणुकीवर निर्बंध आणण्याचा विचार करीत असल्याच्या वृत्ताने व्यापारीही चिंतेत आहेत. नवीन कांदा येईपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.पंधरा दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याचा दर पन्नास रुपयांवर गेल्याने ग्राहक चांगलाच हबकून गेला आहे. गेले काही दिवस राज्यात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी साठवलेला कांदा खराब झाला आहे. कांद्याच्या रोपांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्याचे दिसत आहे, पण ग्राहकाकडून कांद्याची मागणी कायम राहिल्याने कांद्याचे भाव चढेच आहेत. नवीन लाल कांदा बाजारात येण्याला डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव वाढलेलेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.लासलगावमध्ये आज कांदा भावात २३० रुपयांनी घट झाली. लिलावात १,४०१ ते ४,२४७ रुपयांदरम्यान भाव जाहीर झाले. सरासरी भाव ३,९०० रुपये होता. बाजारपेठेत ५१० वाहनांतून कांदा आवक झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत भावामध्ये ८५० रुपयांची घसरण झाली आहे. केंद्राच्या शिष्टमंडळाने मागील सप्ताहामध्ये लासलगावला भेट देऊन माहिती घेतली. या पथकाच्या भेटीनंतर केंद्र सरकार कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध आणण्याची शक्यता आहे.येत्या दोन दिवसांत दर कमी न झाल्यास सरकार कांदा व्यापाऱ्यांवर साठ्याबाबत मर्यादा घालणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे व्यापारी कांदा खरेदी करताना सावध भूमिका आहेत. नाफेड व एनएससीएफ यांनी कांदा २२ रुपये किलो दराने विकणे सुरू ठेवले आहे. मदर्स डेअरी कडून कांदा २३ रुपये ९० पैसे प्रतिकिलो दराने दिला जात आहे. तरीही कांद्याचे किरकोळ बाजारातील दर कमी होताना दिसत नाहीत.निवडणुकीमुळे भीतीकांद्याच्या वाढलेल्या दरामुळे दिल्लीतील भाजपच्या सरकारला १९९८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कांद्याच्या वाढलेल्या भावाचा सत्ताधारी पक्षाने धसका घेतला. महाराष्टÑ व हरियाणात विधानसभा निवडणूक होत असल्याने केंद्राने उपाययोजना सुरू केल्या आहेत.विविध ठिकाणचे दर जास्तचसध्या दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये कांद्याचे भाव ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. गुरगाव व जम्मूत कांद्याचे भाव साठ रुपये किलो असल्याचेही मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुंबईतही कांद्याचा दर ६0 रुपये आहे.

टॅग्स :onionकांदा