जुन्या नाशकातील घरांमध्ये पाणी शिरले

By Admin | Updated: June 12, 2017 01:24 IST2017-06-12T01:23:48+5:302017-06-12T01:24:50+5:30

नाशिकरोड, पंचवटी, सिडकोत पावसाचा जोर

Water entered the old Nashik house | जुन्या नाशकातील घरांमध्ये पाणी शिरले

जुन्या नाशकातील घरांमध्ये पाणी शिरले

 जुने नाशिक :  सिडको आणि आम्रपाली झोपडपट्टी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाले. जुने नाशिक या भागात उंच-सखल परिसर असून बहुतांश घरे रस्त्यांना समांतर तसेच रस्ते उंच आणि घरांची दारे खाली असल्यामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. जुन्या नाशकातील बागवानपुरा, नाईकवाडीपुरा, नानावली, चौकमंडई, खडकाळी आदि भागांमधील घरांत पावसाचे पाणी आले होते. गटारींची दुरवस्था झाल्याने पावसाचे पाणी घरात साचल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी पाणी उपसताना नागरिकांचे हाल झाले. त्याचप्रमाणे शहरातील मल्हारखान, सावित्रीबाई फुले तसेच नाशिकरोड येथील आम्रपाली झोपडपट्टीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले. अनेक झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले.

Web Title: Water entered the old Nashik house