शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणातून पाणी विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:59 IST

लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती.

भगूर : लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र भरारीपथक नियुक्त करून शेतकऱ्यांच्या पंपमोटारी काढण्याची ताकीद देऊन तेव्हाच पाणी सोडण्याची इशारा दिला. तशी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रविवारी दुपारी पाणी सोडले व चेहेडी बंधारा भरल्यानंतर बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे १५ दिवसांचे संकट टळले आहे.भगूर नदी एमईएस लष्करी बंधारा ते नाशिकरोडचा चेहडीबंधारा कोरडाठाक पडला होता. परिसरातील शहर गावाना एक दिवस मिळेल ऐवढेच पाणी राहिले होते. त्यावेळी लष्करी छावणी परिषद, भगूर, सिन्नर नगर परिषद औद्योगिक विकास मंडळ यांच्या पाणी रोटेशन मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने भरारी पथक नेमले़ प्रथम सर्व शेतकऱ्यांच्या पंप मोटारी जप्त करा, तरच पाणी विसर्ग केला जाईल, असा सक्त आदेश दिला. भरारीपथकाने ५९ पंपमोटारी जप्त केल्या, तरीही पाणी विसर्ग होईना मात्र लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दखल घेऊन जलसंपदा उपविभागीय अभियंता पी. एम. कुलकर्णी, पी. एस. शेख, रवींद्र संसारे, वाणीयांच्यासह विविध अधिकारी यांनी दारणा नदीच्या काठावर बैठक घेऊन पोलीस संरक्षण मागणी चर्चा करून लष्करी अधिकारी यांनी जवान सोबत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाणीचोरी होऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांना दिल्याने नंतर जलसंपदा विभागाने भगूर त चेहेडी बंधारा भरेल ऐवढेच पाणी सोडले. त्यामुळे तूर्तास पाणीटंचाई दूर झाली आहे़दरम्यान, लहवित, बाजिगरा, भगूर ते नाशिकरोड, चेहेडी बंधारा परीसर काठावरील ४०० शेतकºयांच्या मोटारी पंप आहे आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा हेच शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उचलतात त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी समस्या निर्माण होते करीता जलसंपदा पाणीवापर संस्था अधिकारी यांचे भरारी पथकसोबत वीजकामगार व लष्करी जवान यांनी ४०० शेतकरी यांना प्रत्यक्ष भेटून पाणीचोरी रोखण्याचा दि.३१ जुलैपर्यंत प्रयत्न करू नये, असा सक्त तोंडी आदेश दिला आणि गस्त चालू ठेवली आहे.पाणीचोरी केल्यास गुन्हे दाखलबेकायदेशीर पाणीचोरीचा प्रयत्न केला तर त्या शेतकºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे़कोटेकोर अंमलबजावणी झाली तर निदान परिसरातील नागरिकांना १५ दिवस पाणी मिळेल. जर शेतकºयांनी पाणी चोरले तर नागरिकांना पिण्यासाठी फक्त पाच दिवस पुरेल नंतर रोटेशन पाणी मिळणे अशक्य होण्याची शक्यता असल्याचे समजते.  शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थिती पाहून पाणीचोरी करू नये, असे आवाहन भरारी पथकाने केले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी