वटारला झापास आग लागून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:49 IST2020-04-07T23:49:13+5:302020-04-07T23:49:25+5:30
वटार येथे मंगळवारी (दि.७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झापास अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या आहेत.

वटारला झापास आग लागून नुकसान
वटार : येथे मंगळवारी (दि.७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झापास अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या आहेत. येथील शेतमजूर बायजाबाई मनोहर पिंपळसे हे सर्व शेतमजुरीसाठी गेल्याने घराला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. सदर महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. थोडेफार मजुरी करून साठविलेले सामानदेखील या आगीत जळाल्याने हे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.