भारुडातून दिला पाणीबचतीचा संदेश
By Admin | Updated: March 23, 2017 21:27 IST2017-03-23T21:27:18+5:302017-03-23T21:27:31+5:30
नाशिकरोड : श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत जलसंवर्धन दिनानिमित्त भारुडाद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्यात आला.

भारुडातून दिला पाणीबचतीचा संदेश
नाशिकरोड : श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत जलसंवर्धन दिनानिमित्त भारुडाद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. जागतिक जलसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पाणीबचतीचे महत्त्व सांगून पाणी वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजवून सांगण्यासाठी भारुडाद्वारे संदेश देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राधा मुतालिक देसाई यांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून पाणी कसे वाचवता येईल, याबद्दल सगळ्यांना मार्गदर्शन केले.
कमलावती कोठारी शाळा
जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या प्राथमिक शाळेत जागतिक जलसंवर्धन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेखा बोकडे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून जलप्रतिज्ञा दिली. यावेळी विद्यार्थ्यांना ‘पाणी हे जीवन आहे, पाण्याचा अपव्यय टाळा’ असा संदेश छाया जाधव यांनी दिला. शाळेत पाणीबचतीविषयी विविध चित्र, तक्ते लावून जल चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. पाणीबचतीची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी व पालकांची फेरी काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी झनकर व आभार सुषमा यादव यांनी मानले. यावेळी जयश्री भडके, शोभा गरुड, कल्याणी कुऱ्हे, रेवती बुरकुले, निर्मला दिवेकर, अरुण काळे आदि उपस्थित होते.