शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:45 IST

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे.

नाशिक : नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ सांगणाºया पालिकेच्या गलथान कारभारावर काय कारवाई करायची असा प्रश्न परीसरातील नागरीक करीत आहेत. सदगुरूनगर- खांदवेनगरला लागून जाणाºया पाइपलाइन रस्त्यावर बळवंतनगर येथे २००७ मध्ये २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला. या जलकुंभातून परिसरातील गणेशनगर, बळवंतनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, आनंदवल्ली यासह अन्य भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडण्यात आलेली मुख्य जलवाहिनीच छताजवळ चहूबाजूने लिकेज् असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून २४ तास पाणीगळती होत असते. त्यामुळे जलकुंभाखाली भलेमोठे डबके साचले असून, त्याला तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जलकुंभाजवळच असलेला नालाही या पाण्याने बारमाही प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.स्थानिक जागरूक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना कळवूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधीत पाणीबचतीबाबत गंभीर आहे काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.प्रशासनाची अशीही शक्कलया जलकुंभातून सातपूर आणि गंगापूर परिसरांतील बºयाचशा नगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम हाती घेतल्यास नागरिकांना म्हणाव्या तेवढ्या वेगाने पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूणच लाखो लिटर पाणी वाया गेले तरी चालेल पण पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा अजब विचार प्रशासनाकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सदरचा जलकुंभ २००७ साली बांधण्यात आला आहे. मात्र काही वर्षांतच त्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या कमी कालावधी जलकुंभाची अशाप्रकारे दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मध्यंतरी महापालिकेने वॉटर आॅडिट केले, परंतु अशावेळीदेखील हा प्रकार आढळला नाही काय, असादेखील प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका