सिन्नर ‘लायन्स’च्या अध्यक्षपदी वारूंगसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:03 IST2019-07-02T18:02:24+5:302019-07-02T18:03:11+5:30
सिन्नर : शहरात वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी या संस्थेच्या सन २०१९-२० सालासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी पांडुरंग वारूंगसे यांची तर सचिवपदी अनिल दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सिन्नर ‘लायन्स’च्या अध्यक्षपदी वारूंगसे
लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्षभरासाठीची वारूंगसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत बबन वाजे यांची खजिनदार पदावर नियुक्ती करण्यात आली. लायन्स ट्रस्टचे सचिव डॉ. विजय लोहारकर, खजिनदार मनिष गुजराथी, मावळते अध्यक्ष राजश्री कपोते, अपर्णा क्षत्रिय, स्मीता थोरात, ज्येष्ठ सदस्य कृष्णाजी भगत यांच्यासह लायन्स सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. सिन्नर लायन्सने तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. मापरवाडी येथे आदिवासी मुलांसाठी अंगणवाडी सुरू करण्यात आली असून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरूजनांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्याची परंपरा जोपासली आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना एकत्र घेवून त्यांना शैक्षणिक मदत करणे, वृक्षारोपण, गणेश आरास स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावा, रोग निवारण शिबिरे आदी उपक्रम लायन्स क्लब आॅफ सिन्नरच्या वतीने दरवर्षी केले जातात.