वार्शी धरण ओव्हर फ्लो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:25 IST2018-08-28T14:25:22+5:302018-08-28T14:25:40+5:30
खर्डे : या परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरण ओव्हरफ्लो झाल्याने खर्डे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .

वार्शी धरण ओव्हर फ्लो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
खर्डे : या परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरण ओव्हरफ्लो झाल्याने खर्डे येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे .देवळा तालुक्यातील पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे परिसरातील सर्वात मोठे असलेले वार्शी धरण ओव्हरफ्लो होऊन,सांडव्याचे पाणी कोलथी नदीत पडल्याने खर्डे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . यावर्षी जून महिन्यात पेरणीयुक्त पाऊस झाला . यानंतर पावसाने दडी मारल्यानंतर पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते .गेल्या आठदहा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे .मात्र , अद्याप दमदार पाऊस नसल्यामुळे नदी ,नाले कोठडी ठाक पडली आहेत . वार्शी धरण डोंगर पायथ्याशी असल्याने त्याच्या लाभक्षेत्रात सुरवातीला झालेल्या पावसाने कोलथी नदीच्या उगमस्थानी पाण्याचा श्रोत वाढल्याने धरणाच्या पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढ होत गेल्याने धरण ओरफ्लो झाले. मात्र ,परिसरातील कणकापूर ,शेरी ,खर्डे ,वडाळा व कांचने येथील छोटे मोठे पाझर तलाव कोरडे ठाक असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . या परिसरातील नागरिक दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.