शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सावधान : मकरसंक्रांतीला पतंग उडविणार असाल तर तुमच्यावरही ओढावू शकते ‘संक्रांत’; मांजा देऊ शकतो ‘धक्का‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:00 IST

पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते.

ठळक मुद्दे धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा. दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.

नाशिक : वीजतारांमध्ये अडकलेली पतंग काढताना जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेली पतंग काढणे धोक्याचे ठरते. याकरता दक्षता घेणे आवश्यक आहेच. परंतु आता धातूमिश्रित मांजादेखील बाजारात मिळत असल्याने अशा मांजाचा वीजतारांशी संपर्क आला तर त्यातूनही वीजप्रवाह प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे पतंगबाजीचा धोका अधिकच वाढला आहे.मकर संक्रतीला महिनाभराचा कालावधी असला तरीही पतंगोत्सव साजरा करण्यास आतापासूनच सुरु वात झाली आहे. त्यातच वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्चदाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरु ण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते.महावितरणचे आवाहनजिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासन्तास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.हे लक्षात ठेवा* वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतू शकते.* वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.* वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.* धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.* दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.

टॅग्स :NashikनाशिकmahavitaranमहावितरणAccidentअपघात