शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेचा इशारा : हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता वाढली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:49 IST

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या तर शेतकऱ्यांना उरल्यासुरल्या पिकांची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला देखील सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत.जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान यातून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्'ातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्'ातील जवळपास सर्वच पिके नष्ट झाली आहे, तर द्राक्षांची मोठी हानी झाल्याने हंगामातील द्राक्ष उत्पादनदेखील कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हाती आलेले तसेच शेतातील उभे पीक वाहून गेल्यामुळे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची झळ कायम असताना जिल्ह्यात येत्या ६ ते ८ तारखेदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकºयांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यापूर्वीच परतीच्या पावसाने नुकसान केले असताना आता अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. विशेषत: डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने यापूर्वी अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यांची हानी होण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाºया जिल्हा प्रशासनाला यंदा जूनपासूनच लहरी पावसामुळे धावपळ करावी लागत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आता आपत्ती निवारण आणि पंचनामन्याच्या कामाला जुंपली आहे.हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषत: शेतकºयांचा उरलासुरला शेतमाल वाचवण्यिाचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेतकºयांना सावध राहण्याचा सल्ला देण्याबरोबर पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस