त्र्यंबकेश्वर गर्भगृह प्रवेशाबाबत सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:14 IST2020-02-17T23:59:10+5:302020-02-18T00:14:05+5:30

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दिले आहे.

Warning about access to Trimbakeshwar sanctum | त्र्यंबकेश्वर गर्भगृह प्रवेशाबाबत सतर्कता

त्र्यंबकेश्वर गर्भगृह प्रवेशाबाबत सतर्कता

ठळक मुद्देमहाशिवरात्र तयारी : जिल्हाधिकाऱ्यांकडून ट्रस्टला पत्र

नाशिक : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दिले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर महाशिवरात्रीला देशभरातील भाविकांची मोठी गर्दी होते. धार्मिक पूजाविधी करण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील अनेक भाविक त्र्यंबकेश्वरला भेट देत असतात. सुटीचा दिवस असल्याने भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्याचे टाळले पाहिजे असे पत्र पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि कोणतीही घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. महाशिवरात्री उत्सवाची त्र्यंबकेश्वरला जोरदार तयारी सुरू असून उत्सवासाठी त्र्यंबकनगरी सज्ज झालेली आहे. त्र्यंबकेश्वरला वर्षभर साजºया होणाºया उत्सवापैकी महाशिवरात्री हा एक मोठा उत्सव असून जिल्ह्णातील तसेच राज्य आणि देशातील भाविकही या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. बुधवारी येणारी शिवजयंती आणि लागलीच शुक्रवारी महाशिवरात्री असल्याने लागून आलेल्या सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी गर्भगृहात जाण्याचा भाविकांचा ओढा असतो. मंदिरात पुुरुषांना सोवळे नेसून जाता येते. यासाठी वेळ निश्चित असली तरी गर्भगृहात जाण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू होते. यातून चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून कोणतीही घटना घडू नये यासाठी आपल्या पातळीवर खबरदारीचा उपाय करावा असे पत्र जिल्हा प्रशासनाने देवस्थान ट्रस्टला पाठविले आहे. पोलीस अधीक्षकांकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेनुसार प्रशासनानेदेखील सतर्कतेबाबतच्या सूचना देवस्थान ट्रस्टला केल्या आहेत.
देवस्थान ट्रस्ट आपल्या पातळीवर काळजी घेणार असले तरी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी टॉवर पॉइंट उभारण्यात येणार आहेत, तर संपर्कासाठीची यंत्रणा राबविण्यात येणार आहे.

Web Title: Warning about access to Trimbakeshwar sanctum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.