वर्धा पोलिसांचे विशेष पथक घेणार बेपत्ता जवानाचा शोध
By Admin | Updated: April 30, 2017 01:06 IST2017-04-30T01:06:26+5:302017-04-30T01:06:26+5:30
बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन तेजपूर (आसाम) येथे १२७ आरसीसीमध्ये कार्यरत जवान कैलास सोमाजी गेडाम हे मागील २० दिवसांपासून बेपत्ता आहेत.

वर्धा पोलिसांचे विशेष पथक घेणार बेपत्ता जवानाचा शोध
येवला : तालुक्यातील शिक्षकांना वेळेत वेतन मिळत नसल्याने संताप व्यक्त करून शिक्षक जिल्हा बँकेबाहेर आंदोलने करत आहेत. मात्र वेतन रखडण्याला कारणीभूत स्टेट बँक असून, पुरेशा प्रमाणात रोज पैसे दिले जात नसल्याने जिल्हा बँक प्रशासन हतबल झाले आहे.
स्टेट बँकेत जिल्हा बँकेचे तब्बल एक कोटी ५० लाख रुपये अडकले असतानाही रोष मात्र जिल्हा बँकेला सहन करण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेने खरीप हंगामात २१० कोटी कर्जवाटप केले असून, वसुली केवळ १७ कोटीच झाली आहे. त्यामुळे शेतकरी व इतर सर्व कर्जदारांनी कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे संचालक किशोर दराडे यांनी केले आहे.
तालुक्यात नगरसूल येथे शिक्षकांनी बँकेला कुलूप ठोकले तर येवल्यात शाखाधिकाऱ्यांना घेराव घातला; पण वेतन रखडण्याची कारणे शिक्षकांनी समजून घेऊन जी स्टेट बँक पैसे देत नाही, त्या बँकेलादेखील विचारणा करावी म्हणजे वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल असे आवाहन बँकेचे तालुका संचालक किशोर दराडे यांनी केला आहे.
तालुक्यातील शिक्षकांच्या पगारासाठी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतून स्टेट बँकेत आरटीजीईस करण्यात येऊन दोन कोटी रक्कम
वर्ग करण्यात आली आहे. मात्र
मागील चार-पाच दिवसांत स्टेट बँकेतून रोज चार ते पाच लाख रु पयेच दिले जात असूनही रक्कम जिल्हा बँकेच्या बारा शाखांना वाटून द्यावी लागत आहे. परिणामी शिक्षकांना दोन-चार हजार रुपये देण्याची
वेळ जिल्हा बँकेवर आली आहे. स्टेट बँकेने रुपयाही जिल्हा बँकेला दिला नाही.
यामुळे परिस्थिती अजूनच बिकट बनत आहेत. येथील स्टेट
बँकेत नवीन शाखाधिकारी आलेले असून, त्यांच्याशी तसेच नाशिक येथील अधिकाऱ्यांशी बोलणे
करून पाठपुरावा केला जाऊनही अद्याप पुरेसे चलन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)