प्रभाग समिती सभापती; निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: March 31, 2016 00:15 IST2016-03-31T00:06:11+5:302016-03-31T00:15:20+5:30
प्रभाग समिती सभापती; निवडणूक कार्यक्रम जाहीर

प्रभाग समिती सभापती; निवडणूक कार्यक्रम जाहीर
नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समितींच्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १२ व १३ एप्रिल रोजी निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे. मनपाच्या सहा प्रभाग समितींच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता सातपूर विभाग, दुपारी १२.३० वाजता सिडको विभाग तर दुपारी ४ वाजता नाशिकरोड विभागाच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पश्चिम विभाग, दुपारी १२.३० वाजता पंचवटी विभाग आणि दुपारी ४ वाजता पूर्व विभागाच्या सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. मनपात सत्ताधारी मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि अपक्ष यांची महाआघाडी असल्याने पाचही विभागात महाआघाडीचा सभापती होणे निश्चित मानले जात आहे.