शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ३० मध्ये महिला इच्छुकांची संख्या मोठी

By admin | Updated: November 14, 2016 01:21 IST

उत्सुकता : सर्वांनाच मिळाले आश्वासन

 इंदिरानगर : प्रभाग ३० मध्ये अ, ब, क, ड या चारही जागांवर महिलांना उमेदवारी करता येणार आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना या पक्षांमधील इच्छुकांच्या भाऊगर्दीत महिला जास्त आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. सर्वांना शब्द दिला आहे कामास लागा म्हणून. त्यामुळे कोणास उमेदवारी मिळणार, कोण कामास लागणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रभाग ३० हा पूर्वीचा जुना प्रभाग ३८ असून यामधील फक्त वडाळागाव, प्रभाग ५३ मधील राजीवनगर, महारुद्र कॉलनी, किशोरनगर, पेठेनगर रस्ता, जाखडीनगर, राणेनगर तर प्रभाग ५४ चा चिंतामणी कॉलनी, श्रद्धाविहार कॉलनी, शिव कॉलनी, पांडवनगरीसह परिसर आला आहे. सध्या भाजपाकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये पती नाही तर पत्नी अशी भूमिका सर्वांनीच घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षास आणि उमेदवारास अडचण निर्माण होणार आहे. भाजपाकडून विद्यमान नगरसेवक महिला, माजी नगरसेवक महिला, माजी नगरसेवक यांची पत्नी, पदाधिकारी महिला आदिंची संख्या जास्त आहे. तसेच शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक महिला, पदाधिकाऱ्यांची पत्नी, महिला पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच मनसेकडून एकमेव विद्यमान नगरसेवक महिलाच या प्रभागात आहे. प्रभाग ३० मध्ये राजीवनगर झोपडपट्टी, सावित्रीबाई झोपडपट्टी, अण्णा भाऊ साठेनगर यांसह वसाहती आहेत. वसाहती आणि झोपडपट्टीमधून इच्छुकांची संख्या बऱ्या प्रमाणात आहे. प्रभागाचे आरक्षण अ) अनुसूचित जमाती महिला, ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, क) सर्वसाधारण, ड) सर्वसाधारण असे झाले आहे. त्यामुळे दोन जागा तर महिलांसाठी राखीव आहेत.दोन जागा सर्वसाधारण असल्याने त्याठिकाणीही महिला उमेदवारी करू शकतात. त्यामुळे चारही ठिकाणी महिला उमेदवार आणि दोन सर्वसाधारण जागेवर आयात उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळेच प्रभाग ३० मध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढणार आहे. (वार्ताहर)