वणी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळद्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:43 IST2019-04-20T00:42:52+5:302019-04-20T00:43:11+5:30
सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वणी-सापुतारा रस्त्याच्या कामामुळद्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती
वणी : सापुतारा रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने होणाऱ्या कामामुळे परिसरातील शेकडो एकर द्राक्षबागांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित असून, याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
द्राक्ष पिकाचा हंगाम संपवून शेतकºयांनी खरड छाटणीस सुरुवात केली आहे. यानंतर द्राक्षबागेला नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या नवीन पालवीवर तसेच रस्त्याने ये-जा करणाºया शेकडो वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ द्राक्षकाडीवर व पानांवर बसत असल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते व अन्नद्रव्यनिर्मितीच्या कामात बाधा येण्याची शक्यता असते.
यामुळे पुढील वर्षाचा द्राक्ष हंगाम पूर्णत: नुकसानीचा ठरेल, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकºयांना वाटू लागली आहे.
याबाबत करंजखेड फाटा, चौसाळे, खोरीफाटा, हस्ते दुमाला, पिंप्रीअंचला, माळेदुमाला, पुणेगाव फाटा, पांडाणे, अंबानेर, सागपाडा तसेच कसबे वणी येथील शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराकडे वेळोवेळी तोंडी व प्रत्यक्षपणे रस्त्यावरील कामावर नियमितपणे पाणी मारण्याची विनंती केली; परंतु या मागणीकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला
आहे.
चालू हंगामात द्राक्ष पिकास योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा परिणाम आर्थिक रसद पुरविणाºया संस्थांवर पडणार असल्याने होणाºया नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.
परिसरातील शेतकरी महेंद्र बोरा, विलास कड, विजय धुळे, संपत चौरे, बबन धुळे, निवृत्ती धुळे, विलास दुगजे, देवीदास बोरसे, नितीन पाटील यांनी सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधींना शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात आणून दिले; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. सदर बाबीकडे संबंधितांनी वेळीच लक्ष न दिल्यास शेतकरी बांधव रस्त्यावर उतरतील तसेच भविष्यात होणाºया नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व ठेकेदाराची असेल, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे. या रस्त्यावर येण्यासाठी एकेरी मार्गदेखील अडचणीचा असल्याने वणी शिवारात अपघाताची संख्या वाढली असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.