Wani-Saputara road accident on the road | वणी-सापुतारा रस्त्यावर बसला अपघात
वणी-सापुतारा रस्त्यावर बसला अपघात

ठळक मुद्देसदर बस ही स्लीपर असल्यामुळे प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे

पांडाणे : वणी-सापुतारा रस्त्यावर धनाई माता मंदिर आणि कड मळयाजवळ शिर्डी-अमरेली बसला शुक्रवारी (दि.२९)अपघात होऊन पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. या बसमध्ये तीस प्रवाशी होते.
वणी पासून तिन किलोमिटर अंतरावर व वणीच्या कचरा डेपोजवळून पिंपळगाव ते घागबारी या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोदकाम करु न त्यावर माती टाकलेली आहे. समोरून गाडी आली की दुसऱ्या बाजूच्या गाडी चालकास रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे, वणीहून शिर्डी-अमरेली बसला अपघात घडला. बसमधून प्रवास करणाऱ्या पटेल नामक प्रवाशाने याबाबत सांगितले, समोरून एक गाडी जोरात गेल्याने चालकाने साईट पट्टीवर गाडी नेली परंतु भुशभुशीत रस्त्यामुळे बस घसरून पलटी झाली. सदर बस ही स्लीपर असल्यामुळे प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, नॅशनल हायवेच्या अधिकारी यांनी रस्त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करुन धुळीवर पाणी मारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Web Title: Wani-Saputara road accident on the road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.