स्मशानभूमीच्या बैठक शेडची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:21 IST2020-07-13T22:07:30+5:302020-07-14T02:21:06+5:30

सटाणा : शासन जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामीण भागात दरवर्षी कोट्यवधी रु पये खर्च करते, मात्र त्या कामांना दर्जा नसल्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे. पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शेडचे बांधकाम कोसळून लाखो रुपये वाया गेले आहेत.

The wall of the cemetery meeting shed collapsed | स्मशानभूमीच्या बैठक शेडची भिंत कोसळली

स्मशानभूमीच्या बैठक शेडची भिंत कोसळली

सटाणा : शासन जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामीण भागात दरवर्षी कोट्यवधी रु पये खर्च करते, मात्र त्या कामांना दर्जा नसल्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे. पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शेडचे बांधकाम कोसळून लाखो रुपये वाया गेले आहेत.
गेल्यावर्षी पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या बांधकामाला मंजुरी मिळून ते उभारण्यात आले होते. त्याला रंगरंगोटी करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र झालेल्या पावसात ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडले पडले आहे. पावसामुळे दोन्ही शेडच्या भिंती कोसळल्या असून, भिंतीचे बांधकामात सिमेंटऐवजी माती वापरल्याचे आढळून आले आहे. अंदाजपत्रकानुसार शेडचे बांधकाम करताना कसूर केल्याचे आढळून आले असून, या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-----------------------
पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या कामाचा अहवाल मागविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
- पांडुरंग कोल्हे,
गटविकास अधिकारी

Web Title: The wall of the cemetery meeting shed collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक