वाखारी : खंडित वीजपुरवठ्याने परिसरातील शेतकरी संतप्त अधिकाºयांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:29 IST2018-02-28T00:29:07+5:302018-02-28T00:29:07+5:30
खर्डे : वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी येथील शेतकºयांनी देवळा उपकेंद्रावर तब्बल दोन तास वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला.

वाखारी : खंडित वीजपुरवठ्याने परिसरातील शेतकरी संतप्त अधिकाºयांना घेराव
खर्डे : वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी येथील शेतकºयांनी देवळा उपकेंद्रावर तब्बल दोन तास वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला. आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत असतानाच दोन दिवसात वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता आर. के. टेंभुर्णे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून वाखारी परिसरात शेतपंपाचा वीजपुरवठा सतत खंडित व कमी दाबाने होत असल्याने अनेकांचे वीजपंप जळाले आहेत, तर काही वीज उपकरणे जळून खाक झाली आहेत. वीज वितरण कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला होता. तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर दोन दिवसात वाखारी परिसरात शेतपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस आबा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली वाखारी शिवाजी पवार, जितेंद्र पवार, साहेबराव सोनजे, योगेश गुंजाळ, देवीदास शिरसाठ, विजय जगदाळे, प्रताप ठाकरे, दगडू चव्हाण, सुरेश मोरे, पंडित चव्हाण, प्रदीप ठाकरे, योगेश ठाकरे, भाऊसाहेब जाधव, साहेबराव पवार, विठ्ठल ठाकरे, समाधान पवार, शांताराम ठाकरे, श्रावण जाधव, सयाजी चव्हाण, आदींसह ४०० ते ५०० शेतकरी सहभागी झाले होते.