शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:21 AM

शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या

नाशिक : शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पाच महिने उलटूनही अद्याप जागानिश्चितीपुढे कुठलीही हालचाल वनविभागाकडून झालेली नाही.  विविध अपघातांमध्ये जखमी झालेले दुर्मीळ प्राणी, पक्षी तसेच तस्करीच्या उद्देशाने आणलेले वन्यजीव रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याअगोदर त्यांच्यावर औषधोपचार करणे गरजेचे ठरते. त्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाने ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारणीचा प्रस्ताव नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक कार्यालय वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात येणार होता.  त्यादृष्टीने तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावाचा प्रवास नाशिक ते नागपूर असा कधी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नाशिकला ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.  सध्या वन्यजिवांवर पश्चिम वनसंरक्षक कार्यालयातच उपचार केले जातात किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी हलविले जाते; मात्र उपचारानंतर शुश्रूषा करण्यासाठी वनविभाग पश्चिम कार्यालयांतर्गत ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे.  याबाबत पश्चिम कार्यालयाने तत्परतेने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाची हवी मंजुरीगंगापूर रोपवाटिकांमधील जागेचा विचार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ करण्यात आला आहे. येथे मोकळ्या जागेत वनविभाग सुमारे अडीच हजार चौरस फूट जागेत हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव व आराखडा नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपूर्वी तयार करून नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.‘कात्रज’च्या धर्तीवर असणार सुविधाकें द्रामधील सोयीसुविधा, वैद्यकीय उपचारपद्धती, पशुवैद्यकीय डॉक्टर व त्यांचे सहायकांची संख्या, आवश्यक औषधे, पिंजऱ्यांची रचना आदी बाबी विचारात घेत निरीक्षण नोंदविण्यात आले. यानुसार प्रस्ताव तयार करताना सर्व आवश्यक बाबी व सोयी-सुविधांचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात आला आहे.बिबट्या, माकड, सर्प, गिधाड यांसारख्या पक्ष्यांसाठी स्वतंत्र सुश्रूषा कक्ष उभारण्यात येणार आहे. वन्यजिवांच्या आरोग्य देखभालीसाठी लागणारा दवाखाना या केंद्रात चालविला जाणार असून सर्व प्रकारची आवश्यक साहित्याने केंद्र अद्ययावत राहणार आहे. कात्रज येथील केंद्राच्या धर्तीवर व त्यापेक्षाही दर्जेदार सुविधा पुरविण्यात येणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागHealthआरोग्य