शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 19:00 IST

शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

ठळक मुद्देशालार्थ आयडीसाठी शिक्षकांची अडवणूक शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी कायम स्वरुपी अधिकारी नेमण्याची शिक्षक संघटनांची मागणी

नाशिक :शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक अशी दोन पदे एकाच अधिकाºयाकडे असल्याने शिक्षकांची दुहेरी अडचण होत असून, शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकपदी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागात शालार्थ आयडीच्या सुमारे २ हजार २०० फाईली पेंडिंग होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात आंदोलने, मोर्चे काढत त्यांची संख्या साडेचारशेवर आणली आहे. मात्र, नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या फाईली मार्गी लावायला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने अधिकाºयांच्या कारभाराविषयी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून संशय घेतला जात आहे. या स्थितीत शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी कार्यालय, वेतन पथकाच्या कार्यालयाजवळ मध्यस्थांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद अजूनही रिक्त असून, या पदाचा कार्यभार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची बढती झाल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार उदय देवरे यांच्याकडे आहे. या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी असल्याने शिक्षकांना त्यांच्या समस्यांविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपसंचालकांची करावी लागते प्रतीक्षा नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांतून शिक्षक त्यांच्या समस्या घेऊन येतात. मात्र, उपसंचालक भेटत नसल्याने शिक्षकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर शिक्षिकांसोबत लहान बाळेही सोबत असल्याने त्यांची हेळसांड होताना दिसते. शिवाय नाशिकपर्यंत येण्या-जाण्याचा खर्च करूनही अनेकदा उपसंचालकांची भेट होत नसल्याने शिक्षकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची तक्रार शिक्षकांमधून दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा