शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 19:03 IST

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देआरटीईच्या दुसऱ्या सोजतीची प्रतिक्षा कायमपहिल्या फेरीनंतर 15 दिवस उलटूनही सूचना नसल्याने साशंकता नाशिक जिल्ह्यातील 12 हजारहून अधिक विथ्यार्थी सोडतीच्या प्रतिक्षेत

  नाशिक : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.आरटीईची प्रक्रिया यंदा आधीच दोन महिने उशिराने सुरू झाली असून, त्यात पहिल्या फेरीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपून आता दोन आठवड्यांचा कालावधी झाला असतानाही दुसरी यादी जाहीर होत नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हे प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुरुवातील २६ एप्रिलनंतर ४ मे आणि १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतीअंति पहिल्या यादीतील दोन हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आरटीई अंतर्गत यंदा जिल्ह्यातील ४५७ शाळांत ५ हजार ७६४ जागा उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास अडीच हजार जागा निश्चित झाल्याने अद्याप दोन हजार जागांवरील प्रवेश शिल्लक आहे. नर्सरी आणि पहिलीच्या वर्गासाठी जिल्हाभरातून १४ हजार ५५३ अर्ज आले असल्याने अद्याप १२ हजार विद्यार्थ्यांचे पालक दुसºया यादीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आरटीईच्या संकेतस्थळावर  पहिल्या यादीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती अजूनही झळकत असून, दुसऱ्या सोडतीविषयी कोणतीही सूचना नसल्याने पालकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. तसेच संकेतस्थळावर दुसरी यादी कधी जाहीर होणार आहे, त्या विलंब का होत आहे, याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा