देवपूर परिसरात पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 3, 2015 00:07 IST2015-08-03T00:07:01+5:302015-08-03T00:07:29+5:30
देवपूर परिसरात पावसाची प्रतीक्षा

देवपूर परिसरात पावसाची प्रतीक्षा
देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात पावसाअभावी चिंतेचे वातावरण पसरले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. परंतु परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळ्यात शेत नांगरून पुढील मशागतीसाठी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा जोरदार पावसाची वाट पाहत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तब्बल महिनाभर पावसाने दडी मारली. त्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आकाशात ढगांची गर्दी दिसत असली तरी पाऊस मात्र बरसत नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे.
अनेकदा पाऊस पडण्यास सुरुवात होते न् होते तोच पाऊस गायब होत असल्याने निराशा होत आहे. उन्हाळ्यात नांगरणी करून पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाची चिंता पावसाच्या प्रतीक्षेने वाढली आहे. पाऊस वेळेत झाला नाही तर खरीब हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)