धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:42 PM2020-08-02T18:42:36+5:302020-08-02T18:43:02+5:30

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Waiting for rain in the catchment area of the dam | धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
1973 सालात प्रथमच चणकापूर प्रकल्प कोरडाठाक झाला होता. तर पुनंद प्रकल्पात मृतसाठा होता. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालिदल झाले होते. मात्र 21 ते 31 जुलै 2019 दरम्यान कोसळधार झालेल्या पावसाने या प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्याने हजारो दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांसह 82 गावातील पाणीयोजनांना संजीवनी मिळाली होती. तर या पावसाने तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंपरी, धार्डेदिगर, खिराड, ओतूर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघूप्रकल्प पूर्णक्षमतेने भरले होते. यंदा 2814 दलधफू क्षमतेच्या चणकापूर प्रकल्पात आजअखेर 590 दलधफू पाणी साठा असून 320 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात 365मिमी पाऊस, तर पाणीसाठा 1191 दलघफू होता. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून 2500 क्युसेकने तर चणकापूर उजव्या कालव्यातून 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तसेच 1404 दलघफू क्षमतेच्या पुनंद प्रकल्पात आजअखेर 422 दलघफू साठा असून गतवर्षी या काळात 653 दलघफू पाणीसाठा होता. त्यातूनही मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु होता. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य वरूणराजाच्या कोसळण्याची आस बाळगून आहेत.

Web Title: Waiting for rain in the catchment area of the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.