मूग उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंटची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:01 IST2019-01-29T19:00:48+5:302019-01-29T19:01:06+5:30
खुल्या बाजारात आवक वाढल्यानंतर भरड धान्याची कमी दराने खरेदी करणा-या व्यापा-यांकडून शेतक-यांची दरवर्षी फसवणूक होत असते. सदर प्रकार रोखण्यासाठी शासनाने सन २०१८-१९ या वर्षी हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुगाला ६९७५,

मूग उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंटची प्रतीक्षा
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : पणन महामंडळाकडून यंदाच्या हंगामात शेतक-यांकडून आधारभूत किमतीत खरेदी करण्यात आलेल्या दोन हजाराहून अधिक क्विंटल मुगाची ५० लाखांहून अधिक रक्कम शेतक-यांना अद्याप मिळालेली नाही. दुसरीकडे सोयाबीन व उडीद उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर पैसे वर्ग होऊन शासनाची खरेदीही पूर्ण झाली आहे.
खुल्या बाजारात आवक वाढल्यानंतर भरड धान्याची कमी दराने खरेदी करणा-या व्यापा-यांकडून शेतक-यांची दरवर्षी फसवणूक होत असते. सदर प्रकार रोखण्यासाठी शासनाने सन २०१८-१९ या वर्षी हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुगाला ६९७५, उडीद ५६०० व सोयाबीन ३३९९ रुपये क्किंटलमागे दर ठरविला. जिल्ह्यातील मोजक्याच केंद्रांवर या धान्याची खरेदी करण्यात आली. त्यात ४०९ शेतकºयांकडून २०२५ क्ंिवटल मुगाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ८३ लाख रुपये शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले असले तरी, निम्मे शेतकरी अद्यापही पणन महामंडळाकडून मिळणाºया पेमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणत: ५८ लाख २४ हजार रुपये शासनाकडून येणे बाकी असून, त्याबाबत स्थानिक पातळीवरून महामंडळाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. शासनाने सोयाबीन, उडीद व मका उत्पादक शेतकºयांना तत्काळ पेमेंट करून दिले, मूग उत्पादक मात्र खरेदी केंद्रे व पणन मंडळाकडे चकरा मारत आहेत.
आधारभूत किमतीत यंदा सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील ५९ शेतकºयांनीच नोंदणी केली. त्यामागे वेळेवर पैसे न मिळणे त्याचबरोबर खुल्या बाजारात व्यापाºयांनी सोयाबीनला चांगला भाव दिल्यामुळे नोंदणी केलेल्या ५९ पैकी फक्त सहा शेतकºयांनीच खरेदी केंद्रावर हजेरी लावल्यामुळे यंदा फक्त ७१ क्विंटल सोयाबीन खरेदी होऊ शकली आहे.
चौकट=======