शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात दस्त नोंदणीसाठी तासंतास प्रतिक्षा ; नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:23 IST

नाशिक शहरातील उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या आहे. नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. 

ठळक मुद्देदस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दीगर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना तोकड्या तासंतास ताटकळत उभे राहण्याची वेळ

नाशिक : शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या असल्याने नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र उपनिबंधक कार्यालयात दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण जगासमोर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून या कालावधीत सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीच्या घराची उणीव जाणवल्याने अनेकांनी घर खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात खरेदी विक्रीच्या व्यावहारांसाठी या महिन्याच्या सुरुवातीपासूनच गर्दी वाढू लागली आहे. परंतु, वाढलेल्या गर्दीच्या तुलनेत उपनिबंधक कार्यालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात अलेल्या उपाय योजना तोकडया आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या आहेत. परंतु, या ठिकाणी दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय येथे येणाऱ्या नागरिकांना पाच पाचच्या टप्प्यांने कार्यालयात प्रक्रियेसाठी पाठविले जाते. त्यामुळे कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उर्वरीत नागरिकाची गर्दी होते. त्याचप्रमाणे चौथ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्या येण्यासाठी एकट लिप्ट असल्याने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचेही उल्लंघन असून या ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. त्यामुळे नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहत आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकRegistrarकुलसचिवsaleविक्रीHomeघर