वाघाळेत शेतकर्यांने टमाटे पिक फेकले उपटून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 23:51 IST2021-09-05T23:50:24+5:302021-09-05T23:51:00+5:30
येवला : टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील वाघाळे येथील शेतकर्याने आपले अर्धा एकरातील टमाटे पिक उपटून फेकले आहे. टमाटे तोडणी, वाहतूकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाघाळेत शेतकर्यांने टमाटे पिक फेकले उपटून
येवला : टमाटे पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील वाघाळे येथील शेतकर्याने आपले अर्धा एकरातील टमाटे पिक उपटून फेकले आहे. टमाटे तोडणी, वाहतूकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अनेक शेतकर्यांनी रस्त्यावर वा जनावरांपुढे टमाटे टाकून देत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. वाघाळे येथील शेतकरी समाधान बाळनाथ सोमासे यांनी अर्धा एकर टमाटे पिक घेतले होते. सध्या बाजारात टमाटे पिकाला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे तोडणी व बाजारात नेण्याचा खर्च वाचेल याचा विचार करत सोमासे यांनी टमाटे पिकच उपटून फेकले.
टमाटे पिकासाठी घरची मजुरी वगळता सुमारे साठ हजार रुपये खर्च आला होता. पिक विक्रीसाठी तयार झाले, तर बाजारात भाव नाही. तोडणी व वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याने पिक उपटून टाकण्याची वेळ आल्याचे सोमासे यांनी सांगीतले. शासनाने टमाटे उत्पादक शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.