राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सटाणा शहराध्यक्षपदी वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:16+5:302021-02-05T05:47:16+5:30

नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विशेष बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार ...

Wagh as NCP's Satana city president | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सटाणा शहराध्यक्षपदी वाघ

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सटाणा शहराध्यक्षपदी वाघ

नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विशेष बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व युवक जिल्हाध्यक्ष कडलग यांच्या उपस्थितीत सटाणा शहराध्यक्षपदी वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वाघ यांना मोठा राजकीय व सामाजिक वारसा लाभला असून आजोबा (कै.) किसनराव वाघ आणि वडील विजयराज वाघ यांनी सटाणा शहराचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सटाणा शहर कार्याध्यक्षपदी सनीर देवरे तर बागलाण विधानसभा कार्याध्यक्षपदी मोहन खैरनार यांचीही नियुक्ती करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, ज.ल.पाटील, रत्नाकर सोनवणे, भारत खैरनार, अनिल चव्हाण, मिलिंद शेवाळे, आनंद सोनवणे, नितीन सोनवणे, नानुशेठ दंडगव्हाळ, दीपक देवरे, सागर वाघ ,बबन खैरनार, स्वप्नील आहिरे, संदीप सोनवणे, जितेंद्र खैरनार, चंद्रशेखर सोनवणे, जयेश वाघ, सोनू शिंदे, भैया जाधव, प्रवीण भदाणे भूपेश गायकवाड, प्रसाद पवार, विकी गुजर, हितेश चव्हाण, सुबोध रौंदळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

310121\31nsk_16_31012021_13.jpg

===Caption===

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सटाणा शहराध्यक्षपदी सुमित वाघ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विजय वाघ, आदि.

Web Title: Wagh as NCP's Satana city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.